महत्त्वाच्या बातम्या

पुरी येथील जगन्नाथ यात्रेत चेंगराचेंगरी; रथाचे दर्शन घेताना चिरडले लोक

      ओडिशातील पुरी येथे जगन्नाथ रथयात्रेदरम्यान एक मोठा अपघात झाला आहे. कुंभमेळा, तिरुपती आणि गोव्यात मंदिराच्या दारात झालेल्या चेंगरा चेंगरीत अनेकांचे बळी गेले. त्यानंतर आता जगन्नाथ येथे देखील अशीच घटना घडली आहे. रविवारी पहाटे 4 वाजता गुंडीचा मंदिरासमोर भगवान जगन्नाथाच्या नंदीघोष रथाजवळ गर्दीत चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 3 भाविकांचा मृत्यू झाला व  30 जण जखमी झाले आहे. चेंगराचेंगरीच्या ठिकाणी जास्त पोलीस बंदोबस्त तैनात नव्हता असे वृत्त आहे. शुक्रवारी (27 जून) दुपारी 4 वाजता पुरीमध्ये भगवान जगन्नाथाची रथयात्रा सुरू झाली. भगवान बलभद्रचा रथ आधी ओढण्यात आला. त्यानंतर सुभद्रा आणि जगन्नाथाचे रथ ओढण्यात आले होते.दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी 10 वाजता पुन्हा रथयात्रा सुरू झाली. भाविकांनी तिन्ही रथ ओढण्यास सुरुवात केली. त्यानंतर भगवान बलभद्र यांचा रथ तलध्वज सकाळी 11.20 वाजता गुंडीचा मंदिरात पोहोचला व देवी सुभद्रा यांचा दर्पदलन रथ दुपारी 12.20 वाजता पोहोचला. भगवान जगन्नाथांचा नंदीघोष रथ दुपारी 1.11वाजता गुंडीचा मंदिरात पोहोचला. शुक्रवारी देवी सुभद्राच्या रथाभोवती गर्दी वाढल्याने 625 भाविकांची प्रकृती खालावली आहे. बसंती साहू (36 वय), प्रेम कांती महंती (वय 78) आणि प्रभात दास अशी यात्रेत मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. मृतदेह पुरी मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आले आहेत. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, 70 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी 9 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!