महत्त्वाच्या बातम्या

पुष्पक रेल्वेतून पडून 5 जणांचा मृत्यू

       सोमवारी  सकाळी मुंबईत   लोकल ट्रेनमधून  पडून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. रेल्वे ही कमी खर्चिक आणि सर्व स्तरातील लोकांच्या प्रवासाचे साधन मानले जाते. तरीही रेल्वे मधून अनेक वेळा प्रवासी पडून त्यांचा मृत्यू झालेला पाहायला मिळतो. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न याठिकाणी उपस्थित होतो.
  रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार  दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान पुष्पक एक्सप्रेस आणि कसारा लोकल एकमेकांना ओलांडत असताना ही घटना घडली. मुंबई ते लखनौ दरम्यान ही पुष्पक एक्सप्रेस धावते. सी एस एम टी वरून सकाळी 8.25 वाजता पुष्पक एक्सप्रेस निघाली होती.
      दररोज रेल्वे मधून 11 प्रवासी पडून त्यांचा मृत्यू होत असतो तरीही रेल्वे प्रशासनाचे याकडे लक्ष नसून त्यांच्याकडे रुग्णवाहिका देखील उपलब्ध नाहीत. असे विधान माजी आमदार विद्या चव्हाण यांनी केले आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात. त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असून यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी उपाय योजना कराव्यात असे 
रेल्वे प्रवासी महासंघाचे प्रमुख सुभाष गुप्ता म्हणाले. रेल्वेतून पडलेल्या प्रवाशांना शिवाजी हॉस्पिटल मध्ये  दाखल केले असून 3 ते 4 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!