महत्त्वाच्या बातम्या

पोवई  नाक्यावरील चप्पलच्या दुकानालाा आग

    सातारा शहरातील पोवई नाका परिसरातील चप्पलच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली. दुकानातील वातानुकूल यंत्रणेत बिघाड झाल्याने शॉर्टसर्किट झाले. मंगळवारी रात्री सुमारे पावणे आठच्या दरम्यान दुकानातला आग लागली.बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. मात्र तेथे आपले कर्तव्य बजावण्यासाठी तैनात असलेल्या  पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने विज पुरवठा खंडित केला व पाण्याने आग विझवली.
      पोवई नाक्यावर शु बॉक्स नावाचे चप्पल चे दुकान आहे. मंगळवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे दुकानातुन  धूर येऊ लागला व आग लागली. सुहास पवार व निकम या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा खंडित केला परंतु तोपर्यंत आग वाढली होती. यामध्ये दुकानाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. दुकानातील चपलांचे बॉक्स तातडीने हटवण्यात आल्याने मालाचेही नुकसान टळले. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचण्याच्या आधीच आग विझवण्यात यश आले होते. दुकानाच्या बाहेर बघायची गर्दी झाली होती.दुकान  कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!