फुकट्या प्रवाशांना पश्चिम रेल्वेचा थंडगार झटका १.७२ कोटीची दंड वसुली
मुंबई :विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाकडून पश्चिम रेल्वेने तब्बल 1.72 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. मुंबई एसी लोकल मधून विनंती केली प्रवास करणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या उपनगरी या नेटवर्कने तिकीट तपासणी मोहीम तीव्र केली आहे. ज्यामुळे विना तिकीट प्रवास करणाऱ्या कडून वसुली होण्यास दंडात लक्षणीय वाढ झाली आहे.
51,600 अधिक प्रवाशांवर दंडात्मक कारवाई
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी निवेदनाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, मुंबई उपनगर विभागात दररोज 109 एसी लोकल चालवले जातात त्यातूनच अंदाजे 1.26 लाख प्रवासी प्रवास करतात. चालू आर्थिक वर्षात 2024 2025 मध्ये जानेवारी 25 पर्यंत मुंबई विभागाच्या तिकीट तपासणी पथकाने विना तिकीट प्रवास करणाऱ्या 51.600 अधिक प्रवाशांवर कारवाई करत 1.72 कोटी दंड वसूल केला
