महत्त्वाच्या बातम्या

शिराळा तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात- आ.सत्यजित देशमुख

        सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील डोंगरी विभाग असलेल्या पांचगणी पठार तसेच मानेवाडी, गुढे हा वाड्या वस्त्या असलेला अतिशय दुर्गम भाग आहे. या विभागाच्या विकासाच्या दृष्टीने विधानसभेत महत्वाचे मुद्दे मांडण्यात आले. शिराळा वाळवा विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित विद्यमान आमदार मा. सत्यजित शिवाजीराव देशमुख साहेब यांनी काल विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. तसेच  येथील युवक सुशिक्षित बेरोजगार आहे त्यांच्या हाताला रोजगार मिळावा या दृष्टीने माननीय सत्यजित देशमुख यांनी  गुढे, पांचगणी, मानेवाडी विभागात रेशीम उद्योग उभारवा अशी मागणी केली. त्यामुळे पठारावरील युवकांना रोजगाराबद्दल एक आशेचा किरण दिसू लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!