बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाला पहिल्यांदा सुवर्ण पदक
बेसबॉल स्पर्धेमध्ये 19 वर्षाखालील गटामध्ये महाराष्ट्र राज्याला सुवर्णपदक मिळाले असून सातारा जिल्ह्यातून सक्षम अजित पवार हा दहिवडीचा खेळाडू याच्या रूपाने पहिल्यांदाच ह्या खेळात जिल्ह्यात गोल्ड मेडल आले आहे.
नांदेड या ठिकाणी राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या या स्पर्धेत एकूण आठ राज्य सहभागी झाले होते. प्रामुख्याने महाराष्ट्र गुजरात आंध्र प्रदेश तमिळनाडू मध्य प्रदेश इत्यादी या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाने छत्तीसगड संघाविरुद्ध अंतिम सामन्यात 0 -2 अशाप्रकारे विजय प्राप्त करून विजेतेपद पटकावले. महाराष्ट्र संघामध्ये दहिवडी कॉलेज दहिवडी महाविद्यालयाचा खेळाडू कुमार सक्षम अजित पवार सहभागी होता . त्याने चमकदार कामगिरी केल्याने महाराष्ट्राला या स्पर्धेत सुवर्ण स्पर्धक प्राप्त झाले.
या खेळाडूंना कोच म्हणून ज्ञानेश काळे यांचे मार्गदर्शन लाभले.
रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य प्रभाकर देशमुख द महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुरेश साळुंखे उप प्राचार्य खेत्रे सर दडस सर साळुंखे मॅडम सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजेत्या संघाबरोबरच सक्षम पवार या खेळाडूचे देखील खूप खूप अभिनंदन केले. सदर खेळाडूस मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक अमीर जाधव सर ज्ञानेश काळे सर (सचिव, जिल्हा बेसबॉल असोसिएशन ) यांनी महाराष्ट्र संघाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून काम पाहिले.

