महत्त्वाच्या बातम्या

बोगस लाडक्या बहिणींची नावे आता फलकावर येणार

       मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली .या योजनेमार्फत महाराष्ट्रातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रुपये पंधराशे असा आर्थिक लाभ डीबीटी द्वारे देण्यात येणार असे जाहीर केले आणि निवडणुकीच्या अगोदर ही योजना सुरूही झाली. 

     पण आता या योजनेत एक ट्विस्ट आला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी कार आहे अथवा नाही याची तपासणी लवकरच जिल्ह्यात सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने आरटीओ कडून अंगणवाडी सेविकांना लाडक्या बहिणीची यादी दिली आहे. कुटुंबातील एका व्यक्तीकडे कार असलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. शासनाने कार असलेल्या लाभार्थ्यांना स्व इच्छेने  हा लाभ सोडावा असे आव्हान केले होते. मात्र यासाठी कमी प्रतीसाद मिळाल्याने आता प्रत्यक्ष लाडक्या बहिणीच्या घरी जाऊन अंगणवाडी सेविकांकडून तपासणी करण्यात येणार आहे.  
   पाच एकर शेती, शासकीय नोकरी नको, याशिवाय यामध्ये अडीच लाख अशी उत्पन्नाची  अट होती. पण आता या अटींची अंमलबजावणी न करणाऱ्या बहिणींची नावे कमी करण्यात येणार आहेत.तसेच ज्या बहिणींच्या नावावर चार चाकी असलेल्यांची नावेही हटविण्यात येणार आहेत. या योजनेचा शासनाने लाभ देताना महिलांकडून हमीपत्र भरून घेतले आहे .यामध्ये चार चाकी नसल्याचे नमूद केल्याने त्यांना लाभ दिला होता, मात्र आता या अर्जांची प्रत्यक्ष छाननी होणार ज्यांच्या नावावर कार असणार त्यांची नावे आता कमी करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!