महत्त्वाच्या बातम्या

भाजप महिला मोर्चा जिल्हा चिटणीसपदी सौ. सारिका शिवराज शेंडे यांची निवड

दहिवडी: भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या सातारा जिल्हा चिटणीसपदी शिखर शिंगणापूर (ता. माण) येथील माजी सरपंच सौ. सारिका शिवराज शेंडे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या सौ. सोनिया जयकुमार गोरे यांनी त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सातारा जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. या प्रक्रियेत माण-खटाव तालुक्यातील अनेक महिला कार्यकर्त्यांच्या पक्षासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. त्याच अनुषंगाने सौ. सारिका शेंडे यांची जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी बोलताना सौ. सोनिया गोरे म्हणाल्या की, महिला मोर्चाच्या माध्यमातून पक्षसंघटना अधिक बळकट करण्याबरोबरच महिला सक्षमीकरणाशी संबंधित शासकीय व सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने आणि एकजुटीने काम करावे.

सौ. सारिका शेंडे यांच्या निवडीमुळे शिखर शिंगणापूर परिसरासह माण तालुक्यातील भाजप महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!