महत्त्वाच्या बातम्या

मटणासाठी मुलाने केला बापाचा खून 

       सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथुन एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मटण खायला घालत नाही या शुल्ल्क कारणावरून मुलाने बापाचा खून केल्याची घटना घडली. दहिवडी पोलिस स्टेशन हद्दितील कासारवाडी तालुका माण येथील  नटराज पांडुरंग सस्ते (वय२९) असे आरोपीचे नाव असून याने स्वतःच्या वडिलांचा खून केला आहे.आरोपीस वडूज जिल्हा न्यायाधीश एस. एन.कोले यांनी जन्मठेपची व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.व दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.

     माण तालुक्यातील कासारवाडी येथे  दि. २९ एप्रिल २०२२ रोजी ही घटना घडली होती. आरोपी नटराज सस्ते याने वडिलांना  मटन खायला का घालत नाही असे म्हणून भांडण काढले व वडील पांडुरंग बाबुराव सस्ते (वय ७०) यांच्या अंगावर धावून गेला असता ते घरातून बाहेर निघून भंडारदरा मळवी नावाच्या शिवारात पळत गेले. त्यांच्या पाठोपाठ आरोपी नटराज पांडुरंग सस्ते हा घरातून हातामध्ये कुऱ्हाड घेऊन भांडारदरा मळवी शिवारात गेला व हातातील कुऱ्हाडीने वडिलांच्या डोक्यात व मानेवर कुऱ्हाडीने मारहाण करून गंभीर दुखापत करून  खून केला. या प्रकरणाची  खबर आरोपीच्या आईने दहिवडी पोलीस ठाण्याला दिली व नटराज सस्ते यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
     सदर गुन्ह्यात पोलीस उपनिरीक्षक डी.डी.तुपे दहिवडी पोलीस स्टेशन यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले. तसेच वैद्यकीय पुरावे जमा केले व कसून तपास करून आरोपीविरुद्ध जिल्हा सत्र न्यायालय, वडुज येथे दोषारोपपत्र दाखल केले. वडूज येथील जिल्हा सत्र न्यायालयात या कामी सरकारी पक्षाच्या वतीने अभियोक्ता अजित प्रताप कदम(साबळे) यांनी काम पाहिले. यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने बारा साक्षीदार तपासण्यात आले.साक्षीदारांचे जाब-जबाब, कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.एस.कोले यांनी आरोपीला दोषी ठरवून १६ डिसेंबर २०२४ रोजी 
आरोपी नटराज पांडुरंग सस्ते (वय२९) यास जन्मठेप व ५००० रू दंड व दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली . 
     याकामी सदर खटला चालवण्या करिता   सरकारी वकील,उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रॉसिक्युशन स्क्वाड पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, महिला पोलिस हवलदार विजयालक्ष्मी दडस, पोलिस कॉन्सटेबल अमीर शिकलगार, पोलिस कॉन्सटेबल  जयवंत शिंदे, दया खाडे यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!