“मदतीचा हात” उपक्रमात विद्यार्थी व स्वयंसेवक सहभागी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली होती. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार खंडाळा अजित पाटील, खंडाळा तालुका स्वीप मतदान जनजागृती अभियान मुख्य नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी गजानन आडे साहेब यांच्या सूचनेनुसार व प्राचार्य शब्बीर नालबंद साहेब यांच्या परिश्रम व संकल्पनेतून आदर्श मतदान केंद्र ११७ -राजेंद्र विद्यालय, खंडाळा ची उभारणी करण्यात आली होती. यासाठी केंद्रप्रमुख सारिका साबळे, विस्तार अधिकारी रमेश यादव यांचे सहाय्य मिळाले.
मतदानदिनी स. ०७:०० ते सायं. ०६:०० वाजेपर्यंत दिव्यांग व वृद्ध मतदारांसाठी “मदतीचा हात” हा उपक्रम राबवला. या उपक्रमाची कृतीतून अंमलाबजावणी होण्यासाठी सुशिला शंकरराव गाढवे महाविद्यालय,खंडाळा मधील राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागात सहभागी असणाऱ्या विद्यार्थी स्वयंसेवक अक्षय आशा देशमाने-बी.ए. भाग ०२,प्रेरणा जयसिंग क्षीरसागर बी.कॉम. भाग ०२,पायल सचिन पवार- बी.कॉम. भाग ०२ यांनी उस्फूर्त सहभाग घेऊन राष्ट्रीय कर्तव्याची जबाबदारी नेटाने पार पाडली. या कार्यात विद्यार्थ्यांना कौशल्य विकास विभाग प्रमुख प्रा.अमीर इनामदार यांनी प्रोत्साहन दिले. शिक्षण महर्षी शंकरराव गाढवे, सचिव संजीव(अनिरुद्ध) गाढवे,सर्व संचालक मंडळ,प्राचार्य डॉ हणमंत जाधव, प्राध्यापक वृंद,कार्यालयीन कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन विद्यार्थ्यांचे केले.
