महत्त्वाच्या बातम्या

महायुतीच्या सरकारने शपथविधीचा सोहळा पुढे ढकलावा

आम्ही शपथविधी होऊ देणार नाही अशी मागणी दादासाहेब ओव्हाळ ह्यांच्या नेतृत्वात काम करत असलेले रिपायचे कराड उत्तर तालुका युवक उपाध्यक्ष मंगेश गायकवाड यांनी केली आहे.राज्यात महायुतीने यश मिळवले आहे. अजून सुद्धा तुम्हाला सरकार स्थापन करता येत नाही. तुमच्यातील अंतर्गत वाद सुरू असल्याचे आम्हाला समजते तुम्ही नेमका पाच तारखेला शपथविधी सोहळा आयोजित केला आहे परंतु मुंबईत चैत्यभूमीत भीम अनुयायी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोठ्या संख्येने जमत असतात त्यामुळे हा शपथविधी सोहळा तातडीने पुढे ढकलण्यात यावा अन्यथा  रिपाईचे प्रदेशाध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या सूचनेनुसार होणारा कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वात काम करत असलेले कराड उत्तर चे युवक उपाध्यक्ष मंगेश गायकवाड यांनी पत्रकाराद्वारे दिला आहे.
      डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून भीम अनुयायी चैत्यभूमीवर जमतात.त्यासाठी चार दिवस अगोदर मुंबईमध्ये भीम अनुयायांचा जनसागर लोटतो डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दि. 6 डिसेंबर 1956 रोजी झाला.
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मुंबई मध्ये भीम अनुयायी मोठ्या संख्येने जाऊ लागले आहेत. असे असताना राज्यात आलेल्या महायुती सरकारचा शपथविधी सोळा पाच तारखेला आयोजित केल्याचे भाजपच्या वतीने जाहीर केले. हा शपथविधी सोहळा आयोजित केल्यामुळे त्याचा परिणाम महापरिनिर्वाण दिनावर होणार आहे.  त्यामुळे महायुतीच्या तिनी पक्षाच्या नेत्यांनी हा सोहळा पुढे ढकलावा अन्यथा आम्ही हा सोहळा होऊ देणार नाही असे दादासाहेब ओव्हाळ साहेब ह्यांच्या नेतृत्वात काम करत असलेले कराड उत्तर चे युवक उपाध्यक्ष मंगेश गायकवाड ह्यांनी ठणकावून सांगितले आहे.
आनंदोत्सव या वेळी नको
शिव शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. ह्या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखले जाते. याच महाराष्ट्रात महायुतीला यश मिळाल्यानंतर महायुतीवाले महपरिनिर्वाण दिनाच्या आदल्या दिवशी जर आनंद उत्सव करण्याचा घाट घालत असतील तर ही बाब चुकीची आहे दुःखत प्रसंगाच्या दिवशीच जर आनंद उत्सवाचा सोहळा करणार असाल तर हा प्रकार त्यांनी थांबवावा. असेही रिपाईचे दादासाहेब ओव्हाळ साहेब ह्यांच्या नेतृत्वात काम करत असलेले मंगेश गायकवाड ह्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!