अपशिंगे पंचक्रोशीतील शाळांमध्ये शशी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट अपशिंगे (मि.) यांच्याकडून “इंग्रजी माझ्या खिशात” या पुस्तकांचे वाटप
अपशिंगे पंचक्रोशीतील सर्व शाळांमध्ये शशी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, अपशिंगे यांच्या मार्फत सौ अनुश्री भिडे, ठाणे यांच्या माध्यमातून “इंग्रजी माझ्या खिशात” या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्यात इंग्रजी विषयाबद्दल भीती असते. हे जाणूनच सौ अनुश्री भिडे यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे इंग्रजी सुधारण्यासाठी संचालिका सारिका निकम व श्री कमलेश निकम यांनी या पुस्तकांच्या 1700 प्रती प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत मोफत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. श्री अनिल गावंडे सर, श्री विक्रम जाधव सर, श्री प्रथमेश पोदार सर, श्री पराग पारवे सर, श्री अमोल पाटील सर, श्री सुहास साठे सर यांचे मार्गदर्शन नेहमीच लाभते असे श्री कमलेश सरांनी सांगितले. तसेच शशी कम्प्युटर इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून श्री कमलेश निकम व सौ सारिका निकम ह्या गेले वीस वर्ष एमकेसीएलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व सामाजिक कार्य करत आहे. तसेच शशी कम्प्युटरचे मार्केटिंग हेड समीर निकम व शिक्षिका ईशा निकम यांचे इंग्रजी माझ्या खिशात पुस्तकाचे वाटप करताना सहकार्य लाभले.
