महाराष्ट्र राज्याची ‘एक जिल्हा एक उत्पादन (ODOP)’ या उपक्रमास चालना देण्यासाठी लोगोची निर्मिती
महाराष्ट्र राज्याने ‘एक जिल्हा एक उत्पादन (ODOP)’ या उपक्रमास चालना देण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. त्यानुषंगाने राज्यामार्फत सर्व ३६ जिल्ह्यांमधून ७२ प्रमुख ODOP उत्पादने अधिसुचित करण्यात आली आहे. ज्यामध्ये औद्योगिक आणि कृषी उत्पादने या दोन्ही क्षेत्रांचा समावेश आहे. या उपक्रमाला अधिक बळकटी देण्यासाठी आणि ODOP उत्पादनांसाठी एकच एकीकृत ब्रँड ओळख निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अधिकृत ODOP लोगो तयार केला आहे.
सातारा जिल्ह्यातील सर्व ODOP उत्पादन विक्रेते, औद्योगिक समुह (क्लस्टर्स) आणि उद्योग घटकांनी अधिकृत ODOP लोगो चा वापर त्यांच्या उत्पादनांच्या पॅकेजिंग, मार्केटिंग साहित्य आणि प्रचारात्मक सामग्रीमध्ये समाविष्ट करण्याबाबत मार्गदर्शन करावे. ज्यामुळे जिल्हयातील प्रमुख वैशिष्टय पूर्ण उत्पादनांना स्थानिक व जागतिक बाजारपेठ मिळण्यास सहकार्य मिळेल तसेच ODOP ब्रँडला बळकटी देणे, उत्पादनाची दृश्यमानता (Visibility) वाढवणे, गुणवत्ता आणि खरेपणाचे चिन्ह म्हणून ODOP उपक्रमाची ग्राहकांमध्ये ओळख निर्माण करण्याची संधी निर्माण होईल.
ODOP उत्पादनांसाठी एक मजबूत व दर्शनिय ओळख निर्माण होईल. ODOP उत्पादनांच्या उद्दीष्टांना प्रचार व प्रसिद्धी च्या माध्यामातून पुढे नेण्यात आणि ODOP उत्पादकांना बाजार पेठ मिळण्यास महत्त्वपूर्ण योगदान होईल, त्यासाठी अधिकृत लोगोचा वापर करावा, असे आवाहन जिल्ह्यातील सर्व उद्योग आस्थापनांना केले आहे.
