महत्त्वाच्या बातम्या

महावितरणच्या उच्च दाब वाहिनीत बिघाड

        महावितरणच्या एमआयडीसी येथीलउच्च दाब सब स्टेशन मधून येणारी 33 केवी पोवई नाका फीडर वाहिनी  केबल आज सकाळी 11 वाजता ना दुरुस्ती झाली.
सदर फिडर    खेड येथील आदर्श नगर जवळ असून या फिडर  मधून पोवई नाका सबस्टेशनला विद्युत पुरवठा केला जाते. सदर बिघाड होताच महावितरणचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी रवाना झाला. तात्काळ सदर वीज प्रवाह दुसऱ्या फिडरवर घेऊन वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.त्यामुळे संपूर्ण पोवई नाका परिसर वीज खंडित  होण्यापासून वाचला.महावितरणाचे अधिकारी तसेच कर्मचारी व ठेकेदारयांच्या चार ते पाच तासाच्या परिश्रमानंतर सदर केबल दुरुस्त करण्यात यश आले.
याप्रसंगी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजित नवाळे शाखा अधिकारीसौ वैभवी पारवे व शाखाधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर लाईनमन खरात लाईनमन आवळे व लाईनमन ओव्हाळ उपस्थित होते.त्याचबरोबर ठेकेदार गिरीश इलेक्ट्रिकल अँड सर्विसेस चे बाळासाहेब पोतदार मनोज देवळे व आशिष देवळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
ऐन दिवाळीत महावितरण ने सदर बिघाड विक्रमी वेळात दुरुस्त  केल्याबद्दल संस्था अधिकारी वर्गाचे व कर्मचारी वर्गाचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!