महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती शिवाजी कॉलेजला माजी विद्यार्थिनींची  एक  लाखाची देणगी

 
सातारा: येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये शुक्रवार दिनांक १८.१0.२०२४ रोजी  तीन माजी विद्यार्थिनींनी आवर्जून कॉलेज व वसतिगृहाला भेट दिली.  सन १९६२ तर १९६५ या कालावधीत त्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये शिकत होत्या. सौ.सुजाता मंडले,श्रीम.पुष्पा माने, श्रीम.देवयानी निकम या तिघीजणी मैत्रिणी. सुजाता मंडले यांनी रुपये २५०००, देवयानी निकम व त्यांचे वडील हरिश्चंद्र महादेव साळुंखे या दोघांनी मिळून ५०००० व पुष्पलता माने यांनी २५००० असे मिळून एक लाख रुपयाची देणगी छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य राजेंद्र मोरे यांच्याकडे धनादेश देऊन सुपूर्द केली. 
             त्यांनी कॉलेज,वसतिगृह ,कमवा आणि शिका योजनेतील बाग,इत्यादी विविध ठिकाणी भेटी दिल्या.   सौ.सुजाता आनंदराव मंडले म्हणाल्या. की‘ ६२ वर्षानंतर आम्ही वसतीगृहास भेट देत आहोत. आज  जेथे  हे होस्टेल आहे तिथे  पावसाळ्यात  खूप चिखल होत होता.उनात येथे बसावं लागत होतं. त्यावेळी फक्त आठ खोल्या होत्या. आज २०० मुली येथे राहत आहेत.मी १९६२ ते ६५ या कालावधीत सातारा येथून बी.ए.भूगोल या विषयाचे शिक्षण पूर्ण केले. १९६६ ते ६७ या कालावधीत बी.ए. झाल्यानंतर मालोजी विद्यालय लोणंद येथे शिक्षिका म्हणून एक वर्ष काम केले. त्यानंतर १९६७ ते ६८ या काळात आझाद कॉलेजच्या एज्युकेशन सातारा येथे डेपुटेशनवर बी.एड. एक वर्ष.पूर्ण केले. १९६८ ते १९८० या कालावधीत संत तुकाराम विद्यालय देहू येथे बारा वर्षे अध्यापन केले. १९८०ते १९९० महाराष्ट्र विद्यालय पिंपरी वाघिरे येथे दहा वर्षे व शेवटचे वर्षे पर्यवेक्षक म्हणून त्या ठिकाणी काम केले. १९९० ते २००० मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होते. कन्या विद्यालय देहू या ठिकाणी त्यांनी दहा वर्षे मुख्याध्यापक म्हणून काम केले. आणि एकूण त्यांची रयत शिक्षण संस्थेची सेवा ३४ वर्षे झाली आहे.. संपूर्ण नोकरी पुण्याजवळील दोन शाखेत केली. सन २००० मध्ये आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला. आज त्यांची तिन्ही मुले डॉक्टर आहेत. पती डॉ. आनंदराव मंडले, एम. एससी. बी. एड पदवी प्राप्त आहेत. कर्मवीर अण्णांचे विचार व त्यातून त्यांच्यावर  झालेले संस्कार यामुळे त्यांचे जीवन सुख समाधानी झाले आहे.
      श्रीमती देवयानी निकम यांनी सन १९६२ ते ६५ या कालावधीत सातारा येथून बी.ए.भूगोल या विषयाचे शिक्षण पूर्ण केले.१९७० ते १९७१ श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या जिजामाता हायस्कूलमध्ये शिकवत होत्या. त्यानंतर जनता शिक्षण संस्थेच्या मिलिंद हायस्कूल या ठिकाणी दोन वर्षे सेवा केली. १९७३  नंतर २००३ डिसेंबर पर्यंत पुणे महापालिकेच्या नेताजी सुभाषचंद्र विद्यालयात १७ वर्षे व यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय तेरा वर्षे सेवा केली. अशी एकूण ३३ वर्षे सेवा करण्याची संधी मिळाली. मराठी व भूगोल  हे दोन विषय इयत्ता नववी व दहावी मध्ये शिकवत होत्या. बहुसंख्य वेळा त्या शिकवीत असलेल्या विषयाचा निकाल शंभर टक्के लागला. पालिकेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारही त्यांना मिळाला त्या वेळचे  अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांचा  मुलगा, मुलगी आपोआपल्या क्षेत्रात पारंगत आहेत. मुलाची मुलगी सई ही टोरेंटो विद्यापीठात एम.ए. करते आहे. सईला  बारावीनंतर टोरेंटो विद्यापीठाची १००% स्कॉलरशिप चार वर्षासाठी मिळाली आहे.ही त्यांच्या आयुष्यातील सुखद घटना असून  तिच्या मेहनतीचे  जिद्दीचे कौतुक त्यांनी केले. 
       श्रीमती.पुष्पलता माने-म्हणाल्या की‘ मी  १९६२ ते ६५ या कालावधीत सातारा येथून एम.ए.मराठी  या विषयाचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षक म्हणून काम करताना खूप आनंद मिळाला. कर्मवीर अण्णांचे विचार व त्यातून त्यांच्यावर  झालेले संस्कार यामुळे माझे  जीवन सुख समाधानी झाले आहे’
         तिघींच्या बोलण्यात प्राचार्य डॉ.शंकरराव उर्फ  उनउने बापू, बॅ.पी.जी.पाटील,प्रा.सौ.सुमतीबाई पाटील  यांचा सहवास लाभल्याचा आणि त्यांच्यामुळे आपल्या शिक्षणात प्रगती झाल्याचा उमाळा जाणवत होता.त्यांनी गोडोलीतील कमवा आणि शिका योजनेस भेट देऊन  कमवा आणि शिका योजना म्हणजे  गरीब मुलांच्या शिक्षणाचा आधार आहे ,आणि कर्मवीरांचा स्वावलंबी बनण्याचा संस्कार आहे असे मत व्यक्त केले. डॉ. रामराजे माने देशमुख सर यांनी कमवा व शिका योजनेची माहिती दिली.  महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी वसतिगृहाच्या प्रमुख प्रा.डॉ. रोशनआरा शेख यांनी मुलींच्या वसतिगृहात चाललेल्या कार्यक्रम  व उपक्रमाची माहिती दिली. प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांनी देणगी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून माजी  विद्यार्थ्यांना या भूमीत प्रेरणा मिळते अशा भावना व्यक्त केल्या.  उपप्राचार्य  डॉ. अनिल कुमार वावरे,प्रा.संदीप  भुजबळ, डॉ.अभिमान निमसे,अधीक्षक तानाजी  सपकाळ इत्यादी   यावेळी उपस्थित होते. त्यांच्या डोळ्यात वसतिगृहातील जुन्या आठवणी दाटून आल्या होत्या. छत्रपती शिवाजी कॉलेज हे आपले माहेर असून ही कर्मवीरांचे वास्तव्य असलेली पवित्र भूमी त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!