महत्त्वाच्या बातम्या

माणमध्ये मिटिंगच्या नावाखाली अण्णांची गावाला हुलकवणी

     ग्रामीण व्यवस्थेचा आत्मा असणारे ग्रामसेवकच माणमधील अनेक गावांना कधी कधी जातच नाहीत अशी चर्चा माण तालुक्यातील प्रत्येक गावातून ऐकायला मिळत आहे. गावचे सरपंच व सदस्य यांच्यावर नियंत्रण ठेऊन गावातील नागरिकांना वेळेवर सोयीसुविधा मिळण्यासाठी ग्रामसेवक यांनी तत्पर राहून नागरिकांची सेवा पूरवायची असते. परंतु ग्रामीण व्यवस्थेचा सेवेकरू नागरिकांची दिशाभूल करून कधीकधी मीटिंगच्या नावाखाली दांडी मारत असल्याचे अनेकदा दिसून आल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे.

      ग्रामसेवक अनेकदा कारणे देतात की पंचायत समिती दहिवडी येथे मीटिंग आहे, जिल्हा परिषद सातारा येथे मीटिंग आहे, ट्रेनिंग साठी बाहेरगावी आलोय. तीन गावांचे चार्ज माझ्याकडे असल्यामुळे मी आज दुसऱ्या गावाला आलोय. असे तिन्ही गावच्या लोकांना सांगून अण्णासाहेब मात्र कुठे असते तिनही गावच्या लोकांना समजत नाही. गावच्या सरपंचांना मात्र नक्की माहीत असते अण्णासाहेब कुठे आहेत ते परंतु अलीकडच्या काळामध्ये पंधरा वित्त आयोगाचा निधी जेव्हापासून येऊ लागला तेव्हापासून सरपंच आणि ग्रामसेवक यांची मैत्री अधिक घट्ट बनली आहे.

      अण्णा साहेबांच्या बोगस मीटिंगमुळे नागरिकांचे अनेक कागदपत्रे कामे रेंगाळत पडत आहेत. नागरिक मात्र अण्णा साहेबांच्या  मिटींगची सखोल चौकशी न करता अण्णासाहेब उद्या येतील या अपेक्षेवर बसून राहतात. ग्रामसेवकांच्या दांडी मारण्याच्या या प्रक्रियेला चाप बसावा अशी नागरिकांमधून मागणी होत आहे..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!