महत्त्वाच्या बातम्या

आपुलकी मतिमंद शाळा व प्रौढ संमिश्र दिव्यांग लघुकेंद्राचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

  
      आपुलकी मतिमंद मुलांच्या शाळेच्या माध्यमातून सुषमा पवार यांनी केलेले काम कौतुकास्पद असून त्यांना सर्वतोपरी सहकार्य करू अशी प्रतिपादन सौ.आशा उतकर, उत्कर्ष ट्रान्समिशन, कंपनीच्या डायरेक्टर यांनी केले. पाचवड तालुका वाई येथील आपुलकी मतिमंद मुलांची शाळा व निवासी शाळा, व आपुलकी प्रौढ संमिश्र दिव्यांगांचे लघु केंद्र या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन पाचवड येथील सह्याद्री मल्टीपर्पज हॉल मध्ये पार पडले त्या प्रसंगी  आशा उतकर बोलत होत्या. त्यावेळी जेष्ठ पत्रकार व सातारा जिल्हा शिक्षक बँकेचे मा. चेअरमन विठ्ठल माने,  तसेच श्री.वेलणकर ,पाचवड गावचे सरपंच महेश गायकवाड, आसले गावचे सरपंच अनिल चव्हाण, फौजी पेट्रोल पंप चे लतिफ पटेल, संस्थेचे अध्यक्ष अनिल पवार  व मुख्याध्यापिका सुषमा पवार, पाचवड वि. से.सो. चेअरमन निलेश शेवाळे,नवलाई पतसंस्थेचे  चेअरमन वसंत शेवाळे आदी मान्यवर हजर होते. 
        यावेळी बोलताना सौ अशा उतकर म्हणाल्या की, आपुलकी मतिमंद मुलांची शाळा व निवासी शाळा व आपुलकी प्रौढ संमिश्र दिव्यांगांचे लघु उद्योग केंद्र हे सातारा जिल्ह्यासाठी दिशादर्शक असून यासाठी या संस्थेच्या सर्वेसर्वा सूषमा पवार त्यांनी भरपूर कष्ट घेतल्यामुळेच ही संस्था आज इथपर्यंत पोचली आहे .या संस्थेचा जिल्हा संस्थांनी आदर्श घ्यावा असे कामकाज त्यांनी केले आहे या संस्थेला जे सहकार्य लागेल ते सहकार्य आम्ही करू असेही यावेळी अशा उतकर म्हणाल्या.
     यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल माने म्हणाले की, या संस्थेने जे काम केलेले आहे ते अत्यंत समाज उपयोगी आणि मतिमंद मुलांची सेवा चांगल्या पद्धतीने करण्यात येते. हे आम्ही गेले अनेक वर्ष पाहिले आहे. मतिमंद मुलांची शाळा चालवणे किती अवघड असते हे आम्हाला ज्ञात आहे ही संस्था एका लहानशा जागेतून मोठ्या जागेत रूपांतरित झाली आज ही संस्था वटवृक्षाप्रमाणे उभी असून यापुढे यांची कामगिरी दिमागदार असेल असेही यावेळी विठ्ठल माने सर म्हणाले. 
       संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असे दोन पुरस्कार देण्यात आले,विद्यार्थी यांना मिळालेल्या बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
 यावेळी आपल्या प्रास्ताविक पर भाषणात सौ सुषमा पवार म्हणाल्या, आपुलकी मतिमंद शाळेची मुले आणि  पाचवड परिसरातील सर्व अंगणवाडी मधील मुले, जिल्हा परिषद शाळा या मधे सहभागी होतात. सोशल इंटीग्रेशन या अंतर्गत दिव्याग मुलांना सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे, तुम्हा सर्वांच्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न करीत असतो. या संस्थेला आजपर्यंत समाज माध्यमातून  सहकार्य होत राहिले.यापुढे असेच सहकार्य आम्हाला मिळो अशी अपेक्षा सुद्धा सुषमा पवार यांनी यावेळी व्यक्त केली .
आभार संचालक सुजाता धर्माधिकारी यांनी मानले,तर सूत्र संचालन नलिनी गायकवाडं मॅडम यांनी केले.
      हे स्नेहसंमेलन पार पाडण्यासाठी या शाळेचे संचालक मानसिंग चव्हाण, कृष्णात काटवटे,साहेबराव पडवळ, महेश ढगे , उर्मिला महामुनी , विद्या शिंगटे, वैशाली माने,सचिन गायकवाड,भारती साळुंखे, या शिक्षकांनी परिश्रम घेतले

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!