माण पंचायत समिती गणासाठी आरक्षण जाहीर
दहिवडी: माण तालुक्यातील पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया सोमवार दि 13 ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालय दहिवडी येथे पार पडली.असून ८ वर्षा पासूनची प्रतीक्षा संपली असून आजपासून राणधुमाळी सुरुवात झाली.माणचे तहसीलदार विकास अहिर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस ग्रामस्थ, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोडतीत एकूण १० पंचायत समिती गणांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. यात विविध प्रवर्गांनुसार खालीलप्रमाणे आरक्षण जाहीर झाले
१. मलवडी – सर्वसाधारण
२. आंधळी – सर्वसाधारण
३. बिदाल – सर्वसाधारण (स्त्री)
४. वावरहिरे – सर्वसाधारण
५. माडी – सर्वसाधारण (स्त्री)
६. वरकुटे म्हसवड – नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)
७. पळशी – नागरिकांचा मागास प्रवर्ग
८. गोंदवले बुद्रुक – अनुसूचित जाती (स्त्री)
९. कुडकुडवाड – सर्वसाधारण (स्त्री)
१०. वरकुटे मलवडी – सर्वसाधारण
यावेळी जाहीर झालेल्या आरक्षणाने अनेकांच्या उत्साहात विरजण घातले तर अनेकांच्या राजकीय आशा पल्लवित करणारे ठरले. तर अनेकांनी दुडघ्याला बांधलेले बाशिंग आज सोडले.त्यामुळे येत्या पंचायत समिती निवडणुकीत अनेक नवीन इच्छुकांची, राजकीय नेतेमंडळीची प्रतिष्ठा पणाला लागणार हे मात्र निश्चित.!
