महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रवादी प्रणित सदस्यांनी भाजपा प्रणित सदस्यांना फोडला घाम

दहिवडी: माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची निवड सोमवारी (ता.१३) होणार होती. मात्र भाजप प्रणित नऊ सदस्य अनुपस्थित राहिल्याने निवडप्रक्रिया कोरमअभावी पुढे ढकलण्यात आली. या पार्श्वभूमीवर सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नऊ संचालकांनी अद्यासी अधिकारी यांच्यावर पक्षपातीपणाचे आणि निवडप्रक्रिया उशिरा लांबवण्याचे गंभीर आरोप केले. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी पुरस्कृत ०९ संचालक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       दरम्यान, भाजप गटाचे सदस्य आजच्या निवडप्रक्रियेत जाणीवपूर्वक अनुपस्थित राहिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!