महत्त्वाच्या बातम्या

मा.ना शंभूराज देसाई  यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी

     पाटण विधानसभा मतदारसंघामधील पहिले शिवतिर्थ असलेल्या मौजे नाडे-नवा रस्ता या ठिकाणी  अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळयानिमित्त पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या  उपस्थितीमध्ये आज दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी जयंती सोहळा संपन्न झाला. यावेळी मा.ना.शंभूराज देसाई यांनी पुतळयास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

      या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोहळयास पोलीस दल व पोलीस बँडच्यावतीने मानवंदना देण्यात आली. तसेच श्री छावा युवा मंच अतित जि.सातारा यांचेवतीने शिवकालीन युध्दकला दांडपट्टा व स्वसंरक्षण यांची प्रात्यक्षिके संपन्न झाली. तसेच यावेळी शाहिर शुभम विभुते सांगली यांचा  पोवाडयाच्या कार्यक्रम संपन्न झाला. यासमयी श्रीमती विजयादेवी देसाई माँसाहेब, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई दादा,  लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई दादा, मा.जयराज देसाई दादा तसेच पदाधिकारी शिवप्रेमी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!