महत्त्वाच्या बातम्या

मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत तांबवे भागातील जाहीर संवाद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

तांबवे : शनिवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी पाटण विधानसभा मतदारसंघातील तांबवे येथे मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर संवाद मेळावा संपन्न झाला. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. 

यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेब म्हणाले की, गेली पाच वर्षे राज्यात मंत्री म्हणून काम केले. या पाच वर्षांत सर्वाधिक विकासनिधी आपल्या पाटण विधानसभा मतदारसंघात आला आहे. या काळात ०२ हजार ९६० कोटी रुपयांचा निधी मतदारसंघात आणून विविध विकासकामे मार्गी लावली आहेत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच न होणारी विकासाची कामे आमच्या कार्यकाळात तांबवे भागात पूर्ण केली. पूर्वी तांबवे गावात पाऊस आला की, बाहेर पडता येत नव्हते, अशी परिस्थिती होती. आता इथे ०४ कोटी रुपयांचा निधी देऊन गावात रस्ता तयार केला. विकासाची अन्य कामेही मार्गी लावली. आता तुमची साथ देण्याची वेळ आहे, असे आवाहन मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी केले. मतदारसंघांची पुनर्रचना होऊन तांबवे जिल्हा परिषद गट पाटण विधानसभा मतदारसंघात आला. तेव्हापासून कर्तव्यभावनेतून, जबाबदारीतून तांबवे भागात काम केले. तसेच मला इतक्या मोठ्या पदावर ज्यांनी बसवले त्यांना मी कधीही विसरणार नाही. मिळालेली सत्ता, अधिकार, मंत्रिपद यांचा वापर मतदारांसाठी केला आणि यापुढेही करत राहणार, अशी ग्वाही मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी याप्रसंगी दिली. 

यावेळी तांबवे भागातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच अन्य पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!