मा. ना. शंभूराज देसाई साहेबांचा महिंद, सणबूर व बनपुरी येथे गावभेट दौरा संपन्न
मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी आज महिंद, सणबूर व बनपुरी येथे भेट देऊन उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी व मतदार बंधू-भगिनींशी संवाद साधला. यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेब म्हणाले की, महिंदमध्ये ०६ कोटी रुपये निधीची विकासकामे आम्ही पूर्ण केली आहेत. पाणी पुरवठा योजना या गावात राबवली आहे. येथील ग्रामस्थांनी ज्या ज्या विकासकामाची मागणी केली, ते ते काम आम्ही केले आहे. तसेच बाचोली-सणबूरमधील शेतकऱ्यांना जंगली प्राण्यांचा होणारा उपद्रव थांबवण्यासाठी येथे सौर कुंपणाची योजना राबविणार आहे. सणबूरमध्ये ०४ कोटी रुपये निधीची विकासकामे आम्ही केली आहेत. तसेच येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठीही निधी मंजूर केला. बनपुरी आणि जवळच्या वाड्यांमध्येदेखील आम्ही मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. त्यामुळे गावांचा विकास करणाऱ्या नेत्याच्या पाठीमागे गावकऱ्यांनी राहिले पाहिजे, असे आवाहन मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी याप्रसंगी केले.
यावेळी विभागातील महिंद, सणबूर, बाचोली, बनपुरी, शिंदेवाडी, चोरगेवा कार्यकर्ते उपस्थित होते.
