महत्त्वाच्या बातम्या

जावली मतदारसंघात रासपच्या शिवाजीराजेंचा झंझावाती प्रचार 

 राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्रचाराचा धुरळा उडत आहे. सातारा-जावली मतदारसंघाचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार शिवाजीराजे माने यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून पायाला भिंगरी बांधून ते संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. यामुळे त्यांचे कार्यकर्ते फुल चार्ज झाले असून प्रत्येक गाव, वाडी- वस्तीवर शिवाजीराजेंच्या प्रचाराचा झंजावात सुरु झाला आहे.

रासपचे शिवाजीराजे माने हे सातारा आणि जावली तालुक्यात गावभेट दौऱ्याद्वारे मतदारसंघ पिंजून काढत आहेत. प्रत्येक गावात भेट देऊन ग्रामस्थांशी, माता- भगिनींशी संवाद साधत आहेत. शिवाजीराजेंना मतदारसंघातून सर्वत्र मोठा प्रतिसाद आणि पाठिंबा मिळत आहे. जावली तालुक्यातील अतिदुर्गम, डोंगराळ भागातील छोट्या- छोट्या गावातही शिवाजीराजे भेट देत असून मतदारांशी संवाद साधत आहेत. त्यांचा दुर्गम खेडोपाड्यात दांडगा जनसंपर्क आहे. त्यामुळे प्रत्येक गावात, वाडी, वस्तीवर शिवाजीराजेंचे उत्साहात, जल्लोषात स्वागत केले जात आहे. एकंदरच शिवाजीराजे म्हणजे आपल्या घरातीलच एक सदस्य आहे, अशी जनभावना असल्याने शिवाजीराजेंना मतदारसंघातून मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!