मिठी नदी स्वच्छता घोटाळ्या प्रकरणी मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवला पहिला एफआयआर
मुंबई शहरातील मिठी नदी स्वच्छता प्रकल्पातील कथीत भ्रष्टाचारा संदर्भात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पहिला एफ आय आर नोंदवला आहे. ज्या अंतर्गत अनेक कंत्राटदार आणि बीएमसी अधिकाऱ्यांना लक्ष्य करून सकाळपासून छापे टाकण्यात आले आहेत.
एफआयआर नुसार कथीत घोटाळ्यात अंदाजे 65 5413311 कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा समावेश आहे. तसेच यामध्ये बनावट सामंजस्य करार वर स्वाक्षरी केल्याबद्दल पाच कंत्राट दारांची नावे देण्यात आले आहेत आणि बीएमसी च्या तीन अधिकाऱ्यांची नावे एफ आय आर मध्ये आहेत. मंगळवारी ईओडब्ल्यू च्या पथकाने 8 ते 9 ठिकाणी समन्वित छापे टाकले. यात कंत्राटदारांची कार्यालये आणि निवासी परिसर तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतील (बीएमसी) अधिकाऱ्यांचा समावेश होता. प्राथमिक चौकशीला औपचारिक प्रकरणात रूपांतरित केल्यानंतर दाखल झालेल्या फौजदारी तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान उपस्थित केलेल्या चिंतांनंतर भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषद सदस्य प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पातील प्रश्न उपस्थित केल्यानंतर सरकारने सखोल चौकशी सुरू केली होती.
