महत्त्वाच्या बातम्या

मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

  शहरातील जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेला सरकार पूर्ण पाठिंबा देईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येसह सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिंदे यांनी सांगितले की, “मुंबईतील अनेक भागांत जुन्या इमारती मोडकळीस आल्या असून, त्या धोकादायक ठरत आहेत. रहिवाशांना सुरक्षित घरे मिळावीत, यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंटचा मार्ग सुकर केला जात आहे. सरकारने  विविध नियम शिथिल करण्याचा निर्णय घेतला असून, हे प्रकल्प लवकरच वेग घेतील.”
      राज्य सरकार आणि महानगरपालिका या योजनांना गती देण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या आणि आर्थिक सहाय्य तत्काळ उपलब्ध करून देतील, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे मुंबईतील रहिवाशांना त्यांच्या नव्या घरांसाठी जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!