मुस्लिम शिवभक्तांनी साजरा केला शिवजन्मोत्सव
सातारा रोड ( कोरेगाव) हे गाव हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असून एक गाव एक शिवजयंती साजरी केली जाते. हिंदू – मुस्लिम युवकांच्या पुढाकाराने साजरा होणाऱ्या शिवजन्मोत्सव निमित्ताने संपूर्ण गावात ठीक ठिकाणी भगवे झेंडे तर अनेक ठिकाणी महिलांनी रांगोळी काढल्या होत्या. सजावट केलेल्या आकर्षक रथावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवून पाडळी, सातारा रोड परिसरातून शिव जयघोषात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शिवभक्तांना अनेकांनी शितपेय, पाणी वाटप केले.
यात जीवन फाळके , राजू पिसाळ, रतनदीप फाळके किरण फाळके, रोहित गाढवे, दत्ता फाळके, निलेश पवार, सुरज फाळके प्रकाश फाळके, मुस्ताक शेख, इंनूस मुजावर, सिकंदर शेख, मुद्दसर कलाल, मोसीन कुरेशी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विधीवत पूजन केली. युसूफ सुतार, सोहेल शेख, अंकिब शेख, समीर अत्तर (फोजी), अरबाज खाटीक, वसीम नाईकवाडी, रिहान सुतार, वाहिद सुतार, शब्बीर शेख, उमेर शेख, उजेर शेख, शहीद कलाल, रमजान मोमीन, जैद सुतार आदींनी यासाठी परिश्रम घेतले.
