रयत शिक्षण संस्थेच्या दहिवडी कॉलेज दहिवडीच्या स्पर्धा परीक्षा केंद्रातील एकाची पोलिस उपनिरीक्षकपदी, तर तिघांची बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायकपदी निवड झाली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून बिदाल येथील राहुल जगदाळे याची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे, तर शिंगणापूरचा ओंकार बडवे, दहिवडीचा उदय तपकिरे व लोधवडेची प्रतीक्षा जगताप यांची सरळ सेवा भरती परीक्षेतून बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायकपदी निवड झाली आहे.
या यशाबद्दल त्यांचे महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे तसेच विद्यमान प्रभारी प्राचार्य डॉ. संजय खेत्रे, उपप्राचार्य डॉ. अनिल दडस, स्पर्धा परीक्षा केंद्र संचालक डॉ. विजय गायकवाड, समन्वयक प्रा. अमोल खंडाळे, महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.