महत्त्वाच्या बातम्या

रवींद्र तुपे यांची नरवणेच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड

  ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना.जयकुमार गोरे यांचे विश्वासू कार्यकर्ते रवींद्र पोपट तुपे यांचे नरवणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.  रवींद्र तुपे हे नामदार जयकुमार गोरे यांचे अनेक वर्षापासूनचे कट्टर आणि विश्वासू कार्यकर्ते आहेत. एकनिष्ठ राहिल्यामुळे नामदार गोरे यांनी त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीला उमेदवारी देऊन निवडून आणले व संचालक बनविले. नरवणे ग्रामपंचायतीचे सरपंच पद रिक्त झाल्यानंतर या पदासाठी रस्सीखेच सुरू असतानाच सर्वानुमते रवींद्र तुपे यांच्या नावावर बिनविरोध शिक्कामोर्तब करण्यात आला.

          सदरची निवड माण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नंदकुमार फडतरे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली असून यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!