महत्त्वाच्या बातम्या

रविराज चव्हाणने फेडरेला लिमाला अस्मान दाखवले; आंधळीत श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त कुस्त्यांचे आयोजन ;भर पावसात रंगले मैदान

दहिवडी: अतिशय झटपट व चटपटीत झालेल्या कुस्तीत अर्जुनवीर वस्ताद काका पवार यांचा पठ्ठा रविराज चव्हाण याने ब्राझीलच्या फेडरेला लीमा याला नागपट्टी डावावार अस्मान दाखवत प्रथम क्रमांकाचे इनाम जिंकले. माण तालुक्यातील आंधळी येथे श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. भर पावसात रंगलेल्या या मैदानाचा कुस्ती प्रेमींनी आनंद लुटला. या मैदानात अनेक लहानमोठ्या चटकदार कुस्त्या झाल्या.

भोसले व्यायाम शाळा सांगलीचा प्रशांत शिंदे विरुद्ध शिवनेरी तालीम अकलूजचा संतोष जगताप यांच्यात अर्धा तास चाललेली द्वितीय क्रमांकाची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. अस्लम काझी यांचा पठ्ठा अमित सुळ याने कांता तरंगे यांचा पठ्ठा विनायक दिडवाघ याने टाकलेला घिस्सा डाव उलटवून अतिशय चपळाईने डंकी टाकून चितपट केले. प्रणव हांडे विरुद्ध आनंदा जाधव आणि कुमार माने विरुद्ध शिवराज डोंबाळे या पैलवानांना कस पाहणाऱ्या कुस्त्या बरोबरीत सोडविण्यात आल्या.

 

       आंधळीचा सुपुत्र ओमराज काळे याने बाहेरची टांग या डावावर बारामतीच्या संदेश शेंडगे याला पराभूत केले. प्रेमराजवर कुस्ती शौकीनांनी बक्षीसांचा वर्षाव केला. कुस्ती मैदानासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन काळे, सरपंच दादासाहेब काळे, संतोष काळे, महादेव ठवरे, सुरेश पवार, घनश्याम काळे, आप्पा गोरे, यशवंत काळे, तानाजी काळे, संजय भोसले, भीमराव शेंबडे, शिवाजी काळे, राहुल काळे, सुधाकर काळे, कर्मा माने, किशोर खरात, भगवान चव्हाण, संभाजी काळे, चंद्रशेखर जाधव, जयकुमार काळे, विक्रम काळे, संजय गोरे आदींनी परिश्रम घेतले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!