महत्त्वाच्या बातम्या

वृक्षारोपण ही काळाची गरज -ना. जयकुमार गोरे  मलवडी येथे महावृक्षारोपण सोहळा संपन्न 

दहिवडी: आपण झाडं तोडली. वाहने वाढली. त्यामुळे प्रदूषण वाढलंय. ही परिस्थिती बदलण्यासाठी झाडं लावणं ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले. वसुंधरा समृद्धी फाउंडेशनच्या माध्यमातून मलवडी (ता‌. माण) येथे आयोजित महावृक्षारोपण कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी ठाणे महानगरपालिकेचे जेष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे, आयकर आयुक्त अमित शिंदे, सिध्दनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष अरुण गोरे, प्राथमिक शिक्षक बॅंकेचे माजी अध्यक्ष बलवंत पाटील, नारायण गोरे, सहाय्यक गटविकास अधिकारी डॉ. चंद्रकांत खाडे, सरपंच दिपाली जगदाळे, श्रीराम पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील जाधव,  दहिवडी आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल, डॉ. मनोज माने आदी मान्यवर उपस्थित होते.

 

         जयकुमार गोरे म्हणाले, जेंव्हा जेंव्हा निसर्गाशी आपण लढलो, जेंव्हा जेंव्हा निसर्गाच्या विरोधात जाऊन आपण काम करायला चालू केलं तेंव्हा तेव्हां आपल्यावर संकट आलेले आहे लक्षात ठेवा. आणि हे संकट आपण ओढून घेतलेले आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपला माण-खटाव वेगाने दुष्काळ मुक्तीकडे वाटचाल करतोय. आपलं प्रत्येक स्वप्नं सत्यात उतरत आहे. पाणी आलंय पण त्या पाण्याचा योग्य वापर केला पाहिजे. वसुंधरा समृद्धी फाऊंडेशन व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हाती घेतलेल्या कार्यात मी तुमच्या सोबत आहे.

 

         हणमंतराव जगदाळे म्हणाले, तरुणांनी एकत्रित येऊन हाती घेतलेला वृक्षारोपणाचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. सुनिल जाधव म्हणाले, माण तालुक्यातील सर्व उजाड माळरानांना हिरवी चादर पांघरण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. डॉ. गणेश जगदाळे यांनी मनोगत व्यक्त केले. सुखदेव सस्ते यांनी प्रास्ताविक केले. चंद्रकांत कोकाटे यांनी सुत्रसंचलन केले तर उत्तम शिंदे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!