राजधानी दिल्लीत पावसाने लावली हजेरी
देशात थंडीचे वातावरण पसरले असताना राजधानी दिल्लीत आज पावसाने हजेरी लावली. आज दिल्लीचे तापमान 13° से होते. थंडीच्या वातावरणात मुसळधार पाऊस पडल्याने राष्ट्रीय तापमनावर परिणाम झालेला दिसून येत आहे. आज दिल्लीत विजांच्या कडकडाट तसेच वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली होती.इंडिया गेट व मोतीलाल नेहरू मार्गांवर दाट धुके पसरले असताना पावसाच्या सरी बसरताना दिसत आहेत. आयएमडी ने आज दिल्लीत ऑरेंज अलर्ट जारी केला असून पुढील दोन दिवस दाट धुक्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
अचानक आलेल्या पावसामुळे तापमानात बदल झाला असून पाऊस पडून गेल्यावर थंडीत वाढ झाली आहे. दिल्लीत आज ऑरेंज अलर्ट दिला असून पुढे दोन दिवसांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. शुक्रवारी राजधानी दिल्लीत AQI 342 नोंदवण्यात आला असून तो अत्यंत खराब श्रेणीत ठेवला गेला.
