महत्त्वाच्या बातम्या

वनदुर्ग किल्ले वासोटा ३० डिसेंबर पासून तीन दिवस राहणार बंद 

    “सहयाद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेला कोयना अभयारण्यामधील घनदाट जंगलामध्ये, शिवसागराच्या विशाल पाण्याच्या कडेला असलेला वासोटा किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे. सोमवार दि.३० डिसेंबर २०२४ ते बुधवार दि.१ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी पर्यंत वासोटा किल्ला  परिसरात प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली आहे.” सातारा जिल्ह्याचे प्रसिद्ध पर्यटन स्थळ व निसर्गप्रेमी, दुर्गप्रेमी, ट्रेकर्स याचा आवडता वनदुर्ग म्हणून वासोटा किल्ल्याची ओळख आहे. जावली तालुक्यातील दुर्गम भागात कोयना अभयारण्य व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात वासोटा किल्ला वसला आहे. पर्यटकांचा आनंद द्विगुणीत करणाऱ्या वासोटा किल्ल्यावरील पर्यटनास दरवर्षी प्रमाणे ३० डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत बंदी घालण्यात आली आहे. या किल्ल्याची ट्रेकर्स, दुर्गप्रेमी, निसर्गप्रेमींसह पर्यटकांना कायमच भुरळ पडते. सुट्टीच्या दिवशी या किल्ल्यावर पर्यटकांची मांदियाळी दिसून येते. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक घराबाहेर पडत असतात.

        त्या पार्श्वभूमीवर वासोटा किल्ला हा वन्यजीव विभागाच्या गाभा क्षेत्रात येत असल्याने या परिसरात पर्यटकांची गर्दी वाढून निसर्ग संपत्तीला कोणतीही हानी पोहचू नये, यासाठी पर्यटकांना ३० डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी २५ या कालावधीत वासोटा किल्ला गाभा क्षेत्रात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तशा सूचना कोयना जलाशयातून पर्यटक वाहतूक करणाऱ्या बोटिंग क्लबना देण्यात आल्या आहेत. या काळात वासोटा किल्ला परिसरात कोणीही बेकायदेशीररीत्या आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अश्या सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत.अशी माहिती बामणोली वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल अधिकारी विजय बाठे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!