महत्त्वाच्या बातम्या

राजेंद्र उच्च माध्यमिक विद्यालय,खंडाळा येथे संविधान दिन उत्साहात साजरा

    राजेंद्र उच्च माध्यमिक विद्यालय,खंडाळा या ठिकाणी संविधान दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साह संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या वेळेस रतिलाल गावित संविधान दिनाचे  महत्त्व स्पष्ट करताना म्हणाले की, संविधान ही भारताची अस्मिता आहे आणि त्यामुळेच आपला देश एकसंघ राहिला आहे. कार्यक्रमाप्रसंगी संविधान उद्देशिकेचे वाचन प्रवीण बोरगावे यांनी केले.

 कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागातील जयप्रकाश गेजगे व सोमनाथ गर्जे यांनी केले या कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य शब्बीर नालबंद, उपप्राचार्या अरुंधती गाढवे, उपमुख्याध्यापिका सुशिला मोहिते पर्यवेक्षक धनंजय महामुनी तसेच शिक्षक  शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!