महत्त्वाच्या बातम्या

राजेंद्र विद्यालयात बालविवाह मुक्त भारत संकल्पाचे आयोजन

 राजेंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, खंडाळा  येथे बालविवाह मुक्त भारत संकल्प कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यालयाचे प्राचार्य शब्बीर नालबंद म्हणाले- बालविवाहाला प्रतिबंध करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. या सामाजिक कामासाठी प्रशासनास संपूर्ण सहकार्य  करणे आवश्यक आहे. या प्रसंगी बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञेचे वाचन प्रवीण बोरगावे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागातील जयप्रकाश गेजगे व सोमनाथ गर्जे यांनी केले.

या कार्यक्रमास माहविद्यलयाच्या उपप्राचार्या अरुंधती गाढवे, उपमुख्याध्यापिका सुशीला मोहिते, पर्यवेक्षक धनंजय महामुनी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!