महत्त्वाच्या बातम्या

राजेंद्र विद्यालय,खंडाळा व पंचक्रोशी विद्यालय,जवळे लोहोम फाटा संघांचा खो खो स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक 

खंडाळा या ठिकाणी झालेल्या जिल्हा स्तरीय खो खो शालेय स्पर्धेत राजेंद्र विद्यालय, खंडाळा १७ वर्षांखालील व १४ वर्षाखालील मुलांच्या संघाने व पंचक्रोशी विद्यालय, जवळे लोहोम फाटा येथील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावले. तसेच साक्षी शेंडगे हीने डेरवण,ता.चिपळूण येथे झालेल्या मैदानी स्पर्धेत १०० मीटर धावणे विभागीय स्तरावर तृतीय क्रमांक पटकवला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे व्ही. एन. गाढवे, विवेक तळेकर,दिग्विजय खंडागळे, विनोद खंडागळे,आकाश लिमन , अनिकेत गाढवे यांचे संस्थेचे अध्यक्ष शंकरराव गाढवे,सचिव अनिरुद्ध गाढवे, प्राचार्य शब्बीर नालबंद, प्राचार्य जयवंत जगताप, उप प्राचार्य अरूंधती गाढवे,उप मुख्याध्यापक सुशिला मोहिते, पर्यवेक्षक धनंजय महामुनी, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!