महत्त्वाच्या बातम्या

राज्यात आतापर्यंत 18.14% मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

    महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणूक पार पडत आहेत. संपूर्ण राज्यात ही प्रक्रिया सुरळीतपणे चालण्यासाठी विविध प्रकारे दक्षता घेण्यात आली आहे. 288 जागांसाठी हे मतदान होणार असून याचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे  राज्यात विविध  ठिकाणी मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. सकाळी सात वाजल्या पासून मतदानाची प्रक्रिया सुरु झाली असून सर्व उमेदवारांची उत्सुकता आपणास पाहायला मिळत आहे. राज्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 18.14 टक्के मतदान करण्यात आले. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ईव्हीएम मशीन मधे बिघाड  झाल्याच्या घटना समोर आल्या परंतु मतदान प्रक्रियेमध्ये विलंब होऊ नये यासाठी तात्काळ प्रयत्न  करण्यात आले. राज्यात 1 लाख 427 केंद्रे सज्ज असून राज्यातील  9.7 कोटी मतदार यावेळी मतदान करतील.आज सकाळी 7 ते संध्याकाळी 6  वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहील. 

       पुणे जिल्ह्यात सकाळी 7 ते 9  दोन तासात 05.53% मतदान झाले आहे. नागपूर मध्ये 6.86% लोकांनी मतदान केले आहे. संगमनेर येथे 20 हजार 61 मतदारांनी मतदान केले, मुंबईत 06.25 % ,   बुलढाण्यात 6.16%, रायगडमध्ये 7.55 % लोकांनी मतदान केले आहे. तर वाशीम मध्ये आत्ता पर्यंत 5.27 % लोकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. गडचिरोली मध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे. नांदेड मध्ये सर्वात कमी लोकांनी मतदान केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!