महत्त्वाच्या बातम्या

महिन्याअखेरीस वातावरणामध्ये बदल….महाराष्ट्रात कडाक्याची थंडी

      नोव्हेंबरच्या सुरुवातीस वातावरणात ऑक्टोबर हिट मुळे तापमानात झालेली वाढ व अवकाळी पाऊस असे मिश्र वातावरण निर्माण झाले होते. परंतु सायकलोनिक सर्क्युलेशनचा परिणाम अजूनही कमी झालेला नाही. भारतात मागील 24 तासात दाट धुके पाहायला मिळाले. या धुक्यामुळे हवेतील गारठयाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. तामिळनाडू मध्ये मागील २४ तासात मुसळधार पाऊस झाला. सायकलोनीक सर्क्युलेशनचा परिणाम संपूर्ण देशावर होताना दिसून येत आहे. देशभरात दाट धुके पुढील पाच दिवस कायम राहील  तर महाराष्ट्रात हळूहळू तापमानात घट होईल.असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

     महाराष्ट्राच्या  उत्तरेत धुळे, नाशिक, निफाड व जळगाव भागामध्ये गारवा वाढत असून मुंबई, ठाणे व उपनगरामध्ये देखील तापमानात घट  होत आहे. डिसेंबरच्या सुरुवातीस गारठा वाढण्याची शक्यता असून कडाक्याची थंडी पडेल. पुढील पाच दिवसात तापमान रात्री 3- 5° ने तर दिवसा 2-4° ने घसरण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.Weather

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!