महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर

            आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर झाली आहे. शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी 45 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात बारामती मतदारसंघाचा देखील समावेश आहे.बारामती मधून योगेंद्र पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे आता बारामतीत काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादीचे युवा नेते महबूब शेख यांना बीड जिल्ह्यातील आष्टी मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे, तर मुक्ताईनगर मधून आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शरद पवार गटाकडून जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत भाग्यश्री आत्राम, रोहित पाटील, राणी लंके ,उदगीरचे सुधाकर भालेकर सररजीत घाटगे यांना देखील उमेदवारी जाहीर झाली आहे. ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पहिली यादी असून दुसऱ्या दोन याद्या येत्या दोन दिवसात जाहीर केल्या जातील असे जयंत पाटील यांनी सांगितले आहे .तीनही पक्षांची प्रत्येकी 85 जागांवर एकमत केले असून उरलेल्या जागांवर मित्र पक्षांशीचर्चा करून त्या जागाही लवकर जाहीर केल्या जातील. तीनही पक्ष 275 जागा लढवणार असून उरलेल्या जागा मित्र पक्षांना देण्यात येतील असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीतील उमेदवार

जयंत पाटील – इस्लामपूर

अनिल देशमुख- काटोल

राजेश टोपे- घनसावंगी

बाळासाहेब पाटील- कराड उत्तर

जितेंद्र आव्हाड- कळबा मुंब्रा 

शशिकांत शिंदे – कोरेगाव

जयप्रकाश दांडेगावकर- वसमत

गुलाबराव देवकर- जळगाव ग्रामीण

हर्षवर्धन पाटील- इंदापूर 

प्राजक्त तनपुरे -राहुरी

अशोकराव पवार- शिरुर

मानसिंगराव नाईक- शिराळा 

सुनील भुसारा- विक्रमगड 

रोहित पवार- कर्जत जामखेड

विनायकराव पाटील- अहमदपूर 

राजेंद्र शिंगणे- सिंदखेडराजा

सुधाकर भालेराव- उदगीर 

चंद्रकांत दानवे- भोकरदन 

चरण वाघमारे- तुमसर 

प्रदीप नाईक- किनवट

विजय भांबळे-जिंतूर 

पृथ्वीराज साठे- केज 

संदीप नाईक- बेलापूर 

बापूसाहेब पठारे- वडगाव शेरी 

दिलीप खोडपे- जामनेर

रोहिणी खडसे- मुक्ताईनगर

सम्राट डोंगरदिवे-मुर्तिजापूर 

रविकांत बोपछे- तिरोडा 

भाग्यश्री अत्राम- अहेरी 

बबलू चौधरी- बदनापूर

सुभाष पवार- मुरबाड

राखी जाधव- घाटकोपर पूर्व

देवदत्त निकम- आंबेगाव

युगेंद्र पवार – बारामती 

संदीप वर्पे- कोपरगाव

 प्रताप ढाकणे- शेवगाव

राणी लंके- पारनेर

मेहबूब शेख- आष्टी 

करमाळा-नारायण पाटील  

महेश कोठे-सोलापूर शहर उत्तर  

प्रशांत यादव- चिपळूण

समरजीत घाटगे – कागल

रोहित आर आर पाटील- तासगाव कवठेमहाकाळ 

प्रशांत जगताप -हडपसर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!