दाना चक्रीवादळाचा ओडिसा ला तडाखा….विमान व रेल्वे वाहतूक ठप्प
दाना चक्रीवादळ पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात तयार झाले आहे. हे चक्रीवादळ गुरुवारी रात्री व शुक्रवारी सकाळपर्यंत उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्याला ओलांडून पुरी आणि सागर बेटांच्या दरम्यान जमिनीवर येण्याचा अंदाज वर्तवला आहे.वाऱ्याची गती ताशी 100 ते 110 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहतील असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.अधिकाऱ्यांनी ओडिसातील 14 जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.वाऱ्याचा वेग प्रचंड असणार आहे त्यामुळे यात्रेकरू तसेच मच्छीमारांना, पर्यटकांना समुद्रात न जाण्यास सांगितले आहे. चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. पीक, रस्ते, घरे,तसेच भूस्खलन व पूर येऊन मोठी हानी होऊ शकते. आयएमडी चे महासंचालक एम महापात्रा यांनी रविवारी सांगितले की , ओडिशा आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ पूर्व लक्ष ठेवण्यात आले आहे. २४ ऑक्टोबर व २५ ऑक्टोबर रोजी ओडीसा आणि किनारी पश्चिम बंगालमध्ये मुसळधार ते खूप 7 ते 20 सेमी आणि अत्यंत मुसळधार 20 सेमी पाऊस पडेल काही ठिकाणी 30 सेमी पेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. चक्रीवादळ जसजसे जवळ येत आहे तसतसे त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. केंद्रपाडामध्ये विविध ठिकाणी झाडे तुटून पडली आहेत.ओडिसा मध्ये समुद्रात उंच लहरी निर्माण झाल्या आहेत. तसेच 3 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे.चक्रीवादळामुळे 200 हून अधिक ट्रेन रद्द केल्या आहेत. तसेच किनारपट्टी भागात विशेष करून कोलकत्ता आणि आसपासच्या प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने कोलकत्याच्या नेत्याची सुभाष चंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व उड्डाणे 15 तासासाठी 25 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत बंद करण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 25 ऑक्टोबर रोजी सकाळी हे वादळ भितरनिका राष्ट्रीय उद्यान आणि उडीसाच्या धामरा बंदरादरम्यान किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
