महत्त्वाच्या बातम्या

वाढदिवसाच्या निमित्ताने स्मशानभूमीस मोटार साहित्य भेट

     आज वाढदिवस म्हटले की जंगी पार्टी, मौज मजा, फिरणे असे समीकर बनले आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने आपण ज्या समाजात जन्मलो वाढलो, घडलो त्या समाजाचं काहीतरी देणं देखील असते हे ओळखून डॉ विकास फरांदे यांनी नवीन होत असलेल्या स्मशानभूमी करता त्याठिकाणी असणाऱ्या बोअरसाठी जवळपास तीस ते चाळीस हजार रुपये खर्च करून मोटार व त्यासाठी लागणारे साहित्य देऊन आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.

      आनेवाडी ता. जावळी गावचे सुपुत्र असलेले डॉ फरांदे यांचे कुटुंब कायमच अशा विधायक सामाजिक कार्यात आपला हाथभार लावत असतात. आनेवाडी, रायगाव, सायगाव, महामुलकरवाडी-मालुसरेवाडी या चार गावासाठी सातारा जावळीचे आमदार व राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिहराजे भोसले यांच्या माध्यमातून व माजी सरपंच कै शिवाजी गोरे यांच्या व ग्रामस्थांच्या प्रयत्नातुन कृष्णा नदीतीरावर भव्य अशी स्मशानभूमी होत आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे. या ठिकाणी काही कामे लोकवर्गणीतून होत आहे. या ठिकाणी  पाण्यासाठी बोअर मारली आहे. त्यासाठी मोटर बसवण्यासाठी डॉ फरांदे व त्यांचे कुटुंबीय पुढे येऊन वाढदिवसाचे औचित्य साधून या कामासाठी बहुमोल वेळ देणारे जेष्ठ नागरिक यशवन्त भाऊ फरांदे यांना  पाण्याच्या मोटरसह होणारा सर्व खर्च आपण स्वतः करणार असल्याचे सांगितले. व प्रत्यक्ष सर्व साहित्य आणून त्या ठिकाणी मोटर बसवून देखील दिली.
       अशा प्रकारे आपला वाढदिवस साजरा करून डॉ फरांदे यांनी समाजापुढे आदर्श देऊ केला आहे. यावेळी त्यांच्या आई हभप शारदाताई फरांदे, भाऊ सुहास फरांदे, वृदा फरांदे, सुहासिनी फरांदे, प्रल्हाद फरांदे यांनी हे सर्व साहित्य ग्रामस्थांना देऊन आणखी काही मदत लागल्यास आम्ही करू असेही सांगितले.  या कुटुंबियांचे सायगावं सरपंच बाळासाहेब कांबळे, समाधान गायकवाड, यशवन्त महामुलकर, संजय निकम, शरद निकम,भानुदास फरांदे,मनेश फरांदे, भाऊ गोरे, मानसिंग फरांदे,शेखर फरांदे, मच्छिन्द्र मुळीक यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!