महत्त्वाच्या बातम्या

वारीतील दिंड्यांसाठी २० हजार रुपये देण्याचा निर्णय – अक्षयमहाराज भोसले

      गेल्यावर्षीच्या वारीप्रसंगी 1500 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रूपये देण्याचा ऐतिहासिक निर्णय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला होता. यावर्षीही वारीतील दिंड्यांना निधी मिळावा यासाठी आध्यामिक सेनेच्यावतीने पाठपुरावा करण्यात आला होता.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याकडे लक्ष देऊन शासन स्तरावरूनव याहीवर्षी दिंड्यांना निधी उपलब्ध करून देण्यात महत्वाची भूमिका बजावली असल्याची माहिती शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष ह.भप.अक्षय महाराज भोसले यांनी दिली.  या निर्णयानंतर शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी मौजे दरे (सातारा) येथे मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रत्यक्ष भेट घेऊन आभार व्यक्त केले.तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेही आभार मानलेत.

      अक्षयमहाराज भोसले म्हणाले, दिंड्यांना याहीवर्षी निधी देण्यात यावा अशी मागणी शिंदे साहेबांकडे करण्यात आली होती.आपले शासन हा गतवर्षी प्रमाणे याहीवर्षी तो निर्णय लवकरच घेतेय असे साहेबांनी सांगितले होते. दिलेला शब्द पाळत निर्णयाचा शासन आदेशही काढण्यात आला आहे. त्यांनीच गेल्यावर्षी अशा प्रकारे निधी देण्याचा पायंडा पाडला होता.

 वारकऱ्यांच्या सेवेसाठी हा निर्णय ऐतिहासिक ठरणार असून वारकऱ्यांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा” हे शिंदे साहेबांचे ब्रीद त्यांच्या कृतीतून पुन्हा सिद्ध झाले आहे.गतवर्षीप्रमाणे यंदाही प्रत्येक दिंडीसाठी २० हजार रुपये अनुदान मिळणार असून निर्णयाची पुनरावृत्ती झाल्याने, हजारो वारकऱ्यांना याचा थेट लाभ होणार आहे.या निर्णयामुळे वारीचे नियोजन अधिक सुसह्य, सुसंगत आणि व्यवस्थित होईल. शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना, सर्व वारकरी बांधव आणि संप्रदायाच्या वतीने शासनाचे आभार मानत असल्याचेही शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!