महत्त्वाच्या बातम्या

माणमधील नुकसानग्रस्तांना ना. गोरेंच्या प्रयत्नाने त्वरित मदत

   माण तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व पळशी येथील नदीत वाहून गेलेल्या युवकाच्या वारसांना शासनाच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आर्थिक मदत केली.माण तालुक्यात मे मध्ये अवकाळी पावसाने अनेक गावात मोठे नुकसान झाले. या नुकसानीत काही घरांची पडझड झाली तर काही ठिकाणी गुरे वाहून गेली. तर काही ठिकाणी गुरांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मंत्रालयातून काही नुकसानग्रस्तांना तातडीने पाच लाख सत्तर हजारांची मदत मिळवून दिली.

        यामध्ये पळशी येथे माणगंगा नदीला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या नवनाथ कोंडिबा पाटोळे या तरुणाच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. ना.जयकुमार गोरे यांनी नवनाथ पाटोळे यांच्या पत्नी माधुरी पाटोळे यांना चार लाख रुपये आर्थिक मदतीचा धनादेश दिला. त्याचबरोबर कुरणेवाडी येथील सुभाष आटपाडकर यांना ५७ हजारांचा धनादेश देण्यात आला. त्यांची एक म्हैस व एक वासरू दगावले होते. तसेच पळसावडे येथील भाऊसाहेब धुलगुडे यांची एक म्हैस दगावली होती. त्यांना ३७ हजार पाचशे रुपयांचा धनादेश देण्यात आला.

       थदाळे येथील राणी दिगंबर शिंगाडे यांची गाय पुरामध्ये वाहून गेली होती. त्यांना ही ३७ हजार ५०० रुपयांचा धनादेश देण्यात आला. त्याचबरोबर गंगोती येथील गोरख अण्णा विरकर यांची गाय दगावली होती. त्यांना ३७ हजार ५०० असे एकूण पाच कुटुंबांना तातडीची मदत दिली. यावेळी तहसीलदार विकास अहिर, सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोर, माजी सभापती अतुल जाधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!