महत्त्वाच्या बातम्या

विभागीय नृत्य स्पर्धेत कासारवाडी शाळा  प्रथम बक्षीसाची  मानकरी 

दहिवडी: कासारवाडी (ता. माण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने कोल्हापूर विभागीय नृत्य स्पर्धेत  प्रथम क्रमांक पटकावला. या नृत्य स्पर्धेचे कराड येथे  आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेच्या यशानंतर कासारवाडी शाळेची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी  निवड झाली आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांना वाव देण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम आयोजित केले जातात. यामुळे विद्यार्थी विविध सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात यश मिळवत आहेत. दरम्यान नुकतेच कराड येथे जिल्ह्याच्यावतीने घेण्यात आलेल्या विभागस्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्या नृत्य स्पर्धेतकासारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक महादेव दडस, सूर्यकांत दडस सर, सौ. मदने मॅडम, शिक्षक वृंद यांनी मार्गदर्शन केले.

 

        यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सातारा जिल्हा भाजपा मा. उपाध्यक्ष किसन सस्ते, सरपंच छाया गंगाराम सस्ते, गंगाराम सस्ते, , ऋतिक सस्ते यांच्यासह अनेक मान्यवरांनी, शाळा व्यवस्थापन समिती, इतर सर्व समित्या आणि गावातील ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!