महत्त्वाच्या बातम्या

विराट कोहलीच्या शानदार खेळीने भारताची उपांत्य फेरी धडाकेबाज एन्ट्री

टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानचा सहा विकेट्सने पराभव करत दमदार विजय मिळवला.

    पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत २४२ धावांचे आव्हान दिले होते. भारताने हे लक्ष्य केवळ ४ विकेट्स गमावत सहज गाठले. विराट कोहलीने निर्णायक खेळी करत विजयश्री खेचून आणली. त्याने शेवटच्या टप्प्यात चौकार मारत न केवल भारताला विजय मिळवून दिला, तर त्याचसोबत आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील ५१ वे शतकही पूर्ण केले.श्रेयस अय्यर, कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनीही मोलाचे योगदान दिले. या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास अधिक वाढला असून, त्यांनी २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमधील पराभवाचा हिशोबही पूर्ण केला.

     हा विजय भारतासाठी सलग दुसरा असून, पाकिस्तानसाठी सलग दुसरा पराभव ठरला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. आता भारतीय संघ उपांत्य फेरीत आणखी एका दमदार विजयासाठी सज्ज झाला आहे!

 टीम इंडियाचा पुढील टप्पा

    उपांत्य फेरीत प्रवेश मिळवणाऱ्या टीम इंडियाला आता पुढील सामन्यात आणखी एक मोठी लढत द्यावी लागणार आहे. रोहित शर्मा आणि संघातील अन्य खेळाडूंच्या भक्कम कामगिरीवर आता चाहत्यांच्या नजरा असणार आहेत.

टीम इंडिया अशाच विजयाने चमकदार कामगिरी करत ट्रॉफी जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!