महत्त्वाच्या बातम्या

विसावानाका येथे वडाच्या झाडाच्या महाकाय फांदीमुळे वाहतुकीस अडथळा

 
    सातारा शहरातील विसावा नाका ते  गोरखपुर पिरवाडी या रस्त्याच्या सुरुवातीला वडाच्या झाडाची महाकाय फांदी वाहतुकीस अडथळा ठरत आहे. सदर रस्ता  हा अत्यंत वर्दळीचा असून अंतर्गत भागात चालू असणाऱ्या सरकारी कामांना व खाजगी कामांना मालपुरवठा करणारे ट्रक यांची ये-जा चालू असते. झाडाची फांदी खूप खाली असल्याने अवजड वाहनांना लक्षात न आल्यामुळे जोरात धक्का बसून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सदर बाबश्री राजा रानडे व श्री धुमाळ यांनी दि 8 जुलै 2023 रोजी सातारा नगरपरिषद निवेदन दिले असून सदर घटनेस एक वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटूनही नगरपरिषदेकडून कोणतीच कारवाई झालेली दिसत नाही.

    इथे काही दिवसात सदर फांदीला तोडल्यास या रस्त्यावरची वाहतूक थांबवून एक आगळे वेगळे आंदोलन करण्याचा गंभीरा इशारा येथील नागरीकांनी दिला आहे.
नव्याने द्दद वाढ झालेल्या सातारा नगरपरिषद मध्ये या भागाचा समावेश करण्यात आला असूनही सातारा नगरपरिषद नागरीकांची कोणतीच बाब गांभीर्याने    घेताना दिसून येत नाही. सदर बाबतीचे नागरीकांच्या सह्यांचे निवेदन खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसते यांना देणार असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!