विसावा नाका ज्येष्ठ नागरिकांनी केला नौदल दिन साजरा
4 डिसेंबर हा नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे निमित्त साधून विसावा नाका येथील मैत्री पार्क जेष्ठ नागरिक संघाने निवृत्त नौदल अधिकारी लेफ्टनंट कमांडर डॉ. श्यामराव यादव यांचा शाल,श्रीफळ, बुके व आंब्याचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.4 डिसेंबर 1971 रोजी भारतीय नौदलाची आय एन एस विक्रांत ही नौका उडवण्याची योजना आखणाऱ्या पाकिस्तानला भारतीय नौदलाने धूळ चारून अभूतपूर्व यश मिळवले. याच्या स्मृतिप्रित्यर्थ ४ डिसेंबर हा नौदल दिन म्हणून साजरा केला जातो.
या सत्कारास उत्तर देताना डॉक्टर यादव यांचा ऊर अभिमानाने भरून आला होता त्यांनी सांगितले की,नौदलामध्ये अनेक सत्कार सोहळे पार पडले परंतु हा सोहळा कायम आठवणीत राहील, कारण सेवानिवृत्तीनंतरही समाजाने आम्ही केलेल्या देश सेवेचा मान ठेवला. या प्रसंगी त्यांनी आपल्या तीस वर्षाच्या सेवेतील प्रत्यक्ष युद्ध नौके वरील व त्यानंतर त्यांनी नौदल हॉस्पिटलमध्ये दिलेली सेवा यांचे अनुभव कथन केले. त्याचबरोबर त्यांनी नौदलाची निर्मिती,नौदलाचा इतिहास व नौदलात असणाऱ्या नोकरीच्या विविध संधी तसेच नौदल सेवेमध्ये असताना आलेले खडतर प्रशिक्षण अनुभव, हळवे प्रसंग असे अनेक आठवणींचे प्रसंग त्यांनी उपस्थितांसमोर मांडले.भारतीय लष्कर सेवेतून सेवा निवृत झालेले दिलीप राजे भोसले उपस्थितांना मार्गदर्शन केले
