महत्त्वाच्या बातम्या

शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून केली विवाहितेने आत्महत्या

पुणे: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात एका महिलेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. ही घटना 1 ऑगस्ट रोजी पिरंगुट वर लवळे ता. मुळशी येथे घडली असून सदर महिलेस 2022 पासून शारीरिक व मानसिक त्रास दिला जात होता. या प्रकरणी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 
समीना सुलतान शेख (वय २०) असे आत्‍महत्‍या केलेल्‍या विवाहितेचे नाव आहे. तर सुलतान रमजान शेख, लायक रमजान शेख आणि रमजान शेख (तिघेही रा. लवळे, ता. मुळशी, जि. पुणे) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत.
         मिळालेल्या माहितीनुसार, विवाहित महिलेस गेल्या 3 वर्षांपासून किरकोळ कारणांवरून शारीरिक व मानसिक त्रास दिला जात होता. सदर महिलेच्या वडिलांनी याबाबत बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.  अब्दुलनबी रज्जाक शेख (वय ४५, रा. गांधीचौक, यादगीर, जि. गुलबर्गा, राज्‍य कर्नाटक) असे फिर्यादीचे नाव असून आरोपी संगनमताने माझ्या मुलीचा छळ करत होते असे त्यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!