शाहूपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील बोगदा परिसरात नाकाबंदी
सरत्या वर्षाला निरोप आणि येणाऱ्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज असलेल्या सातारा शहरवासीयांवर शाहुपुरी पोलीसांनी करडी नजर ठेवली होती. शाहुपुरी पोलीस ठाण्यामार्फत राजवाडा, मोती चौक, समर्थमंदीर तसेच बोगदा येथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोवेकर, तीन पुरुष पोलीस कर्मचारी व एक महिला कर्मचारी त्याचबरोबर होमगार्डस तैनात करण्यात आले होते.
तरुणाईचा व शहराबाहेरून कास बामणोली येथे जाणाऱ्या व येणाऱ्या उस्ताही तरुणाईची पोलीस प्रशासन चौकशी करत होते. संशयीत मद्यपी वाहन चालकाची ब्रेथ ॲनालायझर द्वारे तपासणी करण्यात येत होती आणि दोषी आढळल्यास तत्काळ कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक दुचाकी व चारचाकीची कागदपत्रे लायसन त्याच बरोबर डीकी तपासून खात्री झाल्यानंतर वाहने सोडण्यात आली.
या कारवाईमध्ये सातारा शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक यादव तसेच पोलीस शिपाई निलेश निकम व नागेश खापे उपस्थित होते. या तपासणीमध्ये 8 व्यक्ती दोषी आढळल्या त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
