शिराळा मतदारसंघातील जलसंपदा विभागाच्या कामांसाठी बैठक संपन्न
मुंबई : शिराळा विधानसभा मतदारसंघातील विविध जलसंपदा प्रकल्पांच्या कामांसंदर्भात काल मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत लोकनेते आ. सत्यजित भाऊ देशमुख यांनी जलसंपदा मंत्री मा. ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर विविध मागण्या मांडल्या.
बैठकीत वारणा डावा कालव्याची गळती दुरुस्ती, मायनर ६ आणि १० तसेच वाकुर्डे उपसा सिंचन योजना (भाग-१, टप्पा-३) अंतर्गत शिरसी, कोंडाईवाडी व धामवडे येथील सिंचनासाठी लघु सिंचन योजनेचा सर्व्हे करण्याबाबत चर्चा झाली. तसेच पेठ, धुमाळवाडी, गोळेवाडी येथील कामांचे सर्व्हेक्षण, कार्वे व शेखरवाडी येथे सदोष लाईन बदलून सिंचन व्यवस्था सुधारणे आणि पत शिराळा – टाकवे बोगद्याचे काम पूर्ण करण्यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
मंत्री महोदयांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत सर्व कामे लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे या भागातील शेतीसाठी पाणीपुरवठा सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
