महत्त्वाच्या बातम्या

शेखर गायकवाड यांनी क्राफ्टआर्ट मध्ये उमटवला ठसा- हभप सागर महाराज पवार

     कला ही माणसाला जगवते. ही एक अशी गोष्ट आहे की, ज्याच्याकडे कोणतीही कला असेल तो कधीही उपाशी मरणार नाही. सर्वसामान्य कुटुंबातील शेखर गायकवाड या तरुणाने क्राफ्ट आर्ट ही कला अवगत करून ग्रामीण भागात देखील आपल्या क्राफ्ट आर्ट या कलेत पारंगत होऊन आगळा वेगळा ठसा उमटविला आहे. असे गौरवोदगार प्रसिद्ध व्याख्याते हभप सागर महाराज पवार यांनी केले.
      मोरघर ता जावळी येथे ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमा प्रसंगी  ते बोलत होते. यावेळी  हिंदुराव पाटील वसुली अधिकारी भूविकास बँक, सातारा प्रशांत गुजर अध्यक्ष, धनंजय गोरे सचिव जावळी तालुका पत्रकार संघ जावळी डॉ.अशोक पाटील, बजरंग वंजारी, विवेक मोरे, विनोद गायकवाड,नीलेश गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते,
  यावेळी पवार म्हणाले, जावळी तालुक्यातील मोरघर गावाला साप्रदायिक वारसा आहे. आजच्या तरुण पिढीने हा वारसा जपला पाहिजे. त्यासाठी प्रामाणिक काम करून आपल्या जन्मदात्या आई वडिलांचाही आदर करून त्यांनी दिलेल्या जन्माचे सार्थक केले पाहिजे. आजच्या सोशल मीडियाच्या काळात तरुण पिढी भरकटत चालली आहे. तीला आजच सावरलं नाही तर पुढील काळात परिस्थिती खूपच बिकट होणार आहे. त्यासाठी आजच्या तरुणाईला योग्य मार्गदर्शन असणे गरजेचे आहे. 
   यावेळी गावातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून जलसंपदा विभागात निवड झालेल्या श्रुती गायकवाड हिच्या आई वडिलांचा देखील सन्मान करण्यात आला. याप्रसंगी गावातील महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार विवेक मोरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!